नमस्कार मंडळी ,
मंडळी, महाराष्ट्र मंडळ शिकागो प्रायोजित “स्वर आनंदाचे” हा सांगितिक कार्यक्रम आपल्या भेटीसाठी येत आहे. सुप्रसिद्ध गायक, श्री आनंद भाटे यांच्या शास्त्रीय , नाट्यसंगीत तसेच अभंगावर आधारित सांगितिक मेजवानी आम्ही आपल्यासाठी ११ मे २०१९ रोजी श्री बालाजी मंदिर येथे आयोजित करत आहोत. श्री आनंद भाटे यांना आपण त्यांच्या “आनंद गंधर्व” या उपाधीने ओळखतो. वयाच्या दहाव्या वर्षी स्वतंत्र कार्यक्रम करून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात केली, बालगंधर्वांची पदे हुबेहूब गाणाऱ्या श्री आनंद भाटेंना “आनंद गंधर्व” ही उपाधी देण्यात आली. पंडित भीमसेन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. जाणकार रसिकांना “बालगंधर्व” चित्रपटातील “चिन्मया सकल हृदया” ही श्री आनंद भाटे यांनी गायलेली भैरवी स्मरणात असेल. “स्वर आनंदाचे” या कार्यक्रमांतर्गत आपल्याला त्यांच्या गायकीच्या विविध पैलूंचा आनंद घेता येईल. त्यांना तबल्यावर साथ करतील श्री भरत कामत, आणि हार्मोनियम वर श्री सुधीर नायक.
आपण नेहमीप्रमाणेच हा कार्यक्रम भरभरून प्रतिसाद देऊन यशस्वी कराल अशी आम्ही आशा व्यक्त करतो.
कार्यक्रमाची माहिती पुढीलप्रमाणे:
दिनांक: ११ मे २०१९
स्थळ: वेलूचामी ऑडिटोरियम, श्री वेंकटेश्वरा स्वामी (बालाजी) मंदिर
https://svsbalaji.secure.force.com/veluchamy
वेळ: ११ ते २
तिकीट दर: Premium sitting – $20[sold-out]; General sitting $15; अल्पोपहार देण्यात येईल