Sankrant 2020

MMC 2020 Program Timeline

नमस्कार मंडळी!

२०२० चा आपला पहिला कार्यक्रम धडाकेबाज झाला! संक्रांतीच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी अनिरुद्ध जोशी आणि शमिका भिडे याच्या गाण्यांना जोरदार प्रतिसाद दिलात आणि त्यांची मने जिंकली! त्याचबरोबर स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम आणि अर्थातच तिळगुळ, मोहनथाळ आणि गुळपोळी यांचा आस्वाद घेत जेवणाला देखील भरपूर दाद दिलीत याबद्दल मंडळातर्फे आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!

With a thunderous start to this year’s star-studded lineup, the MMC 2020 committee is very thankful for your overwhelming response to the Sankrant program. Hope you loved the local artist’s contributions and the great food as much as you loved the singing of Aniruddha Joshi and Shamika Bhide.

भारताच्या प्रजासत्ताक दिनावर आधारित नृत्य आणि मराठी शाळेचे कार्यक्रम देखील सादर झाले, त्याला देखील भरघोस प्रतिसाद मिळाला. सर्व स्थानिक कलाकार आणि कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे व आपल्या आशीर्वादांमुळे हा संपूर्ण सोहळा अतिशय छान झाला. 

The dance and Marathi Shala performances based on the Indian Republic Day were widely appreciated by everyone. The hard work of the performers, volunteers and everyone involved in this event paid off and your blessings helped in making this program a grand success. 

We wish for your continued patronage and want to get your feedback on this program and the committee’s plans for the rest of the year. 

Please participate in the survey by clicking on the link below and submitting your response:

या कार्यक्रमाबद्दल आणि आमच्या २०२० सालातल्या इतर योजनांबद्दल आपल्या प्रतिक्रिया जाणून घ्यायची आमची इच्छा आहे. कृपया वर नमूद केलेल्या संकेतस्थाळावर आपला प्रतिसाद कळवावा ही नम्र विनंती. 

आपले प्रेम आहेच, लोभ अधिक वाढावा!

  • आपली कार्यकारिणी २०२०