सांज सरता सरता

सांज सरता सरता …

ती निघून गेली अन् जाताना

वळली वा थांबली नाही

आजची पावले तिची

जराही अडखळली नाही

तो सूर आगळा होता

ती वेळंच परकी होती

रोखताच नजर तिने

त्याने नजर टाळली होती

शमा (सौ. वैशाली सोनपाटकी)