क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले

थोर तिचे उपकार, गर्जा जयजयकार

तिचा गर्जा जयजयकार || धृ ||

एक साध्वी मनी मोहरली

मानवतेचे मर्म जाणिले जिने

स्त्री-शिक्षणाचे  व्रत घेऊनी

यत्न पूजिला तिने

थोर तिचे उपकार || १ ||

कितीक झाले कष्ट तिला

कितिकांनी  केल्या वंचना

परी मांडुनि  संसार आगळा

फुलविला स्त्री-शिक्षणाचा मळा

थोर तिचे उपकार || २ ||

धन्य ती माऊली क्रांती  ज्योत  सावित्रीबाई

धर्म, जात, समाजबंधने  तोडुनी

अबलांना  करून सबला

जगाच्या उद्धाराचा मार्ग तिने  दावला

थोर तिचे उपकार || ३ ||

कै. मीनाक्षी चंद्रमोहन भांबुरे (मंडळ सदस्या सौ. सारा समीर बोंगाळे यांच्या मातोश्री)