गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी
गेलसालीं गेली आढी
आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा
(बहिणाबाई चौधरी – मूळ कविता गुढी उभारनी)
नमस्कार मंडळी,
चैत्रातला पहिला दिवस आणि वसंत ऋतूचे आगमन यांचे औचित्य साधून मराठमोळा गुढी पाडवा हा सण साजरा होतो. मराठी दिनदर्शिकेप्रमाणे ह्या दिवशी नवीन वर्षाची सुरवात होते. रामायणात जेव्हा श्रीराम युद्ध जिंकून अयोध्येत प्रवेश करते झाले तेव्हा आयोध्यावासीयांनी विजयाचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारून श्रीरामांचे स्वागत केले. आपल्याकडे उंच काठीवर रेशमी वस्त्र कलशासहित सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीत घरासमोर उभे केले जाते त्यालाच गुढी असे म्हटले जाते. या दिवशी श्रीखंड पुरी असा पारंपरिक बेत केला जातो, गुढीची पूजा केली जाते, महाराष्ट्रात ठिकठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात, त्यात मराठी संस्कृतीचे दर्शन घडवले जाते. कडुलिंबाचे पान खाऊन निरोगी आयुष्याच्या पुढच्या वाटचालीची मुहूर्तमेढ रोवली जाते. नवीन व्यवसाय किंवा कार्याचा याच दिवशी शुभारंभ केला जातो.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने 30 मार्च 2019 रोजी महाराष्ट्र मंडळ शिकागो आपल्यासाठी एका करमणूक प्रधान नाटक घेऊन येत आहे. मंडळी काही वर्षांपूर्वी आपण सर्वांनीच प्रशांत दामले आणि कविता लाड मेढेकर अभिनित एका लग्नाची गोष्ट हे गाजलेले नाटक पाहिले असेलच. या नाटकाने प्रसिद्धीचे उचांक गाठले. या नाटकातील “सुख म्हणजे नक्की काय असत” हे गीत रसिकांच्या मनावर आजही गारुड करून आहे. यातल्या मन्या आणि मनी चं पुढे काय झालं याची उत्सुकता रसिकांना होतीच, म्हणूनच या नाटकाचा sequel आपल्यासाठी घेऊन येत आहे ” एका लग्नाची पुढची गोष्ट” . प्रशांत दामले , कविता लाड मेढेकर अभिनित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित “एका लग्नाची पुढची गोष्ट” आपल्याला खळखळून हसवायला सज्ज आहे.
गुढी पाडव्यानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच खास आकर्षण म्हणून फोटो बूथ आपले अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात टिपायला सज्ज असेलच. याच बरोबर मागोवा या सदरातील दुसरी मुलाखत घेण्यात येईल तसेच स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम सादर होतील.
RSVP: www.mahamandalchicago.org या संकेतस्थळावर जोरात सुरु आहे. तरी आजच आपली जागा आरक्षित करा.
पाडव्याच्या कार्यक्रमाचे तिकीट दर पुढील प्रमाणे असतील :
Members | Non-Members | |
Premium | $ 50 | $ 55 |
Adults | $ 30 | $ 35 |
Kids (Age 15 and below) | $ 25 | |
Kids babysitting (Age 5 to 12) | $ 20 | $ 22 |
Kids Care: All kids care activities are included in “Kids babysitting” registration.
कार्यक्रमाची रूपरेषा:
11:00 ते 12:30 | रजिस्ट्रेशन श्री सत्यनारायण पूजा फोटो बूथ – १ फॅमिली फोटो |
12:00 ते 12:30 | आरती आणि तीर्थप्रसाद |
11:30 ते 1:00 | सुग्रास भोजन |
1:15 ते 6:30 | स्थानिक कार्यक्रम
|
धन्यवाद,
आपली कार्यकारिणी 2019