Home

Latest News
Marathi Natak - WELCOME JINDAGIॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे
कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ।
ज्येष्ठराजं ब्रह्मणाम् ब्रह्मणस्पत
आ नः शृण्वन्नूतिभिःसीदसादनम् ॥
ॐ महागणाधिपतये नमः ॥

नमस्कार मंडळी,

शुभकार्याची सुरवात आपण आपल्या आराध्य दैवताला अर्थात गणेशाला आवाहन करून करतो. कुठल्याही कार्याचा प्रारंभ म्हणजे “श्रीगणेशा” असे म्हणायची पद्धत आहेच. तेव्हा गजाननाला वंदन करून महाराष्ट्र मंडळ आपल्यासाठी घेऊन येत आहे गणेशोत्सव 2018.

मराठी माणसासाठी गणपती हे केवळ एक दैवत नसून, आपल्या सगळ्यांचा लाडका “बाप्पा” आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केशवजी नाईक चाळीतून लोकमान्यांनी केली आणि आज या उत्सवाला दीपोत्सवापेक्षाही काकणभर अधिक महत्व महाराष्ट्रात दिले जाते. गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसतो तर त्याला सांस्कृतिक दृष्ट्या महत्व असते. अनेक उपक्रम या कालावधीत राबवले जातात, मनोरंजन आणि ज्ञानार्जन यांचा सुरेख संगम साधला जातो. आबालवृद्ध या सोहळ्यात दिवसरात्र राबतात. एकप्रकारे हा उत्सव समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य करतो. एकात्मतेचा संदेश देतो.

आपल्या शिकागो महाराष्ट्र मंडळाने यावर्षीचा गणेशोत्सव आपल्या सर्वांच्या सहभागाने 22 सप्टेंबर 2018 रोजी सेंट चार्ल्स नॉर्थ हायस्कूल येथे आयोजित करण्याचे ठरवले आहे.

मंडळी यावेळच्या गणेशोत्सवाचे आकर्षण आहे “वेलकम जिंदगी” हे नाटक. महाराष्ट्रात गाजलेले, भरत जाधव डॉ गिरीश ओक अभिनित, हसवता हसवता अंतर्मुख करणारे नाटक, आपल्या शिकागोकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

पालकांना नाटकाचा लाभ घेता यावा यासाठी मंडळाने लहान मुलांच्या कॅलिग्राफी च्याकार्यशाळेचे आयोजन केले आहे.
त्याचबरोबर गणेशाची पूजा आणि आरती, शिकागो मराठी शाळेचा विशेष कार्यक्रम, स्नेहभोजन, विसर्जन मिरवणूक हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

कार्यक्रमाची सर्वसाधारण रूपरेखा पुढीलप्रमाणे आहे

सकाळी १० – रजिस्ट्रेशन आणि पूजेस प्रारंभ
सकाळी ११:३० – आरती
दुपारी १२:०० ते १:३० – स्नेहभोजन
दुपारी १:३० ते २:३० – मराठी शाळा आणि इतर मनोरंजनाचे कार्यक्रम
दुपारी २:३० ते ५:०० – मराठी नाटक ‘वेलकम जिंदगी’
संध्याकाळी ५:०० ते ५:३० – अल्पोपहार आणि विसर्जन मिरवणूक
संध्याकाळी ५:४५ – कार्यक्रमाची सांगता

तेव्हा गणेशभक्तांनी लवकरात लवकर RSVP करून गणेशोत्सवाला भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती
RSVP: http://www.mahamandalchicago.org या संकेतस्थळावर जोरात सुरु आहे. तरी आजच आपली जागा आरक्षित करा.
Click HERE for RSVP.
कार्यक्रमाचे तिकीट दर पुढील प्रमाणे असतील :
Premium Seating (Members & Non-Members) : $50 (Gold Seating)
Preferred Seating (Members & Non-Members) : $35  (Silver Seating)
General Seating:

  Members Non-Members
Adults $ 25 $ 30
Kids (Ages 5 to 12) $ 22 $ 27
Kids (Baby Sitting) $ 20 $ 25

जर आपणास ई-मेल आली नसेल तर karyakarini @mahamandalchicago.org ला ई-मेल पाठवावा. तसेच आपल्याला बुकिंग संदर्भात जर काही मदत हवी असेल तर सौ. उल्का नगरकर यांच्याशी ७७३-९६१-४५७१ या क्रमांकावर संध्याकाळी ५:३० नंतर संपर्क साधावा.

Maharashtra Mandal Chicago
आरोग्यसंवर्धन हा या वर्षीच्या महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांना जोडणारा दुवा आहे हे तुम्हाला माहित आहेच. आरोग्यसंवर्धनासाठी एखादा आवडता खेळ खेळणं हा एक अतिशय आनंददायी अनुभव आहे. मराठी माणसाला सर्वाधिक आवडणारा खेळ म्हणजे क्रिकेट. एकेकाळी भारताच्या क्रिकेट संघात गावस्कर, वाडेकर , पारकर, सोलकर आहे अनेक मराठी रथी -महारथी असत . ते दिवस मागे पडले , जुने झाले परंतु तरीही मराठी माणसाचं क्रिकेट प्रेम काही तिळभरही कमी झालं नाही! मराठी माणसाला क्रिकेटची फक्त मॅच पहायला आवडते असं नाही तर क्रिकेट खेळायलादेखील आवडतं. आपल्यापैकी अनेकजण मोठ्या शहरांतल्या छोट्या रस्त्यावर क्रिकेट खेळतच वाढले.

तम्हा सर्वांचं क्रिकेटप्रेम लक्षात घेऊन महाराष्ट्र मंडळाने २९ सप्टेंबर २०१८ या दिवशी दुपारी बारा ते संध्याकाळी सात या वेळेत अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा (Indoor Under arm Box cricket tournament ) Naperville Yard, Naperville या ठिकाणी आयोजित केली आहे . या स्पर्धेचं स्वरूप असं असेल : प्रत्येक team मध्ये दहा खेळाडू आणि चार teams चा एक गट (group). प्रत्येक गटातल्या टीम्स round -robin पद्धतीने एकमेकांशी सामने (matches ) खेळतील .

महाराष्ट्र मंडळातर्फे सर्व खेळाडूंना T -shirts देण्यात येतील आणि स्पर्धेच्या विजेत्यांना रोख रक्कमेच्या स्वरूपात बक्षीस देण्यात येईल. दर वर्षी महाराष्ट्र मंडळाची क्रिकेट स्पर्धा हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम असतो आणि तुमच्या सहकार्याने आणि सहभागाने या वर्षीही कार्यक्रम यशस्वी होईल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा २९ सप्टेंबर हा दिवस तुमच्या दैनंदिनीत क्रिकेट खेळण्यासाठी नक्की राखून ठेवा!


Click HERE for RSVP