Ganeshotsav 2019

नमस्कार मंडळी,
श्रावण महिना सुरु असला तरी आपल्या सर्वांच्या मनात ओढ असते ती भाद्रपदाचीच. याच मुख्य कारण भाद्रपद मास घेऊन येतो आपल्या सर्वांचं लाडकं दैवत गणपती बाप्पा!

जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रें मन कामना पूर्ती, जय देव, जय देव ।।

हे आरतीचे बोल कानावर पडले की मन थेट आपल्या महाराष्ट्राकडे धाव घेतं. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव, आपलं शिकागोचं महाराष्ट्र मंडळ मोठ्या जोमानं, तुम्हां सर्वांबरोबर दिनांक ७ सप्टेंबर रोजी साजरा करणार आहे ‘द हेमन्स कल्चरल सेंटर, एल्जिन’ येथे.
अगदी गणपतीमूर्ती तयार करण्यापासून, उकडीच्या मोदकांचा नैवैद्य ते गणपतीच्या मिरवणूक यांची जय्यत तयारी सुरु आहे. आपल्या सर्वांसाठी, ‘मागोवा’, ‘मंडळाचे नृत्य पथक’ आणि मराठी शाळेच्या मुलांचा परफॉर्मन्स हे स्थानिक कार्यक्रम तर आहेतच परंतु याचबरोबर प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे शिकागोकरांसाठी आणणार आहेत एक सांगीतिक मेजवानी.
नेहमीप्रमाणे स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था आहेच आणि यावर्षी आपल्या बाप्पाला उकडीच्या मोदकांचा नैवैद्य पाठवणार आहेत बेडेकर फूड्स!

तर मंडळी, तुम्हा सर्वांना शिकागो महाराष्ट्र मंडळाकडून गणेशोत्सवाचे आग्रहाचे आमंत्रण!

RSVP:  www.mahamandalchicago.org या संकेतस्थळावर जोरात सुरु आहे. तरी आजच आपली जागा आरक्षित करा.

Program details are as follows:
Date: September 7th, 2019
Venue: The Hemmens Cultural Center, Elgin
Timing: 10 am to 6 pm

Ticket PricesMembersNon-Members
Premium$ 35$ 45
Adults$ 25$ 30
Kids babysitting (Age 5 to 12)$ 20$ 22

Kids Care: All kids care activities are included in “Kids babysitting” registration.
Program outline:

10:00 am to 10:30 amRegistrationश्रीगणेश पूजा
10:30 am  to 11:30 amमहाआरती आणि तीर्थप्रसाद
11:30 am to 1:00 pmLocal programsMaagovaMMC Dance team performanceMarathi Shala kids program
1:00 pm to 2:30 pmLunch
2:30 pm to 5:30 pmMusical program by Rahul Deshpande
5:00 pm to 6:00 pmढोल ताशाच्या गजरात श्री गणेश विसर्जन मिरवणूक 

धन्यवाद,
आपली कार्यकारिणी 2019