Welcome to 2021

नमस्कार मंडळी !

तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. हे वर्ष आपल्या सर्वांसाठी सुखसमृद्धीचे आणि समाधानाचे जावो हीच इच्छा.

१६ जानेवारी! तारीख लक्षात ठेवा हं! संक्रांतीचा कार्यक्रम म्हणजे एक अतिशय सुंदर, सुरेल संध्याकाळ असणार आहे हे नक्की. बृहन्महाराष्ट्र मंडळ आपल्यासाठी घेऊन येत आहे, आर्या आंबेकर ह्या एका तरूण,गुणी , गायिकेनी गायलेली भक्तीगीतं, नाट्यगीतं, लावणी, मराठी रॅाक सॅांग्स, जुनी हिंदी गाणी आणि गज़ल ह्यांची सांगितिक मेजवानी. १६ जानेवारीला मंडळाचा कार्यक्रम संध्याकाळी ६. ३० वाजता सुरु होईल . त्यालाच जोडून पुढे आर्या आंबेकर यांचा सुश्राव्य संगीताचा कार्यक्रम असेल.