जाणिजे यज्ञकर्म! – पनीर पुडिंग – सौ. शुभदा कुलकर्णी

पनीर पुडिंग

साहित्य:
४ कप दूध (Whole)
२ कप किसलेलं किंवा चुरलेलं पनीर
१ कप साखर
१/२ चमचा वेलदोडा पूड
१२ ते १५ बदामाचे बारीक तुकडे
१२ ते १५ काजूचे तुकडे
केशर
पाहिजे असल्यास गुलाबपाणी

पाककृती:
प्रथम साखर एका भांड्यामध्ये घेऊन, ती भिजेल इतपत पाणी घालावे. ते भांडे गॅसवर ठेऊन त्या मिश्रणाला उकळी आणावी. त्यात किसलेले पनीर घालावे. मिश्रण साधारण १० ते १५ मिनिटे गरम करावे, म्हणजे पनीर मऊ होईल.

दुसऱ्या भांड्यामध्ये कमी आचेवर दूध आटवायला ठेवावे. दूध आटवल्यावर, पनीर आणि साखरेचे मिश्रण त्यात घालावे. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात चवीनुसार अधिक साखर घालण्यास हरकत नाही. मिश्रण अधुनमधुन थोड्याथोड्या वेळाने हलवत रहावे जेणेकरून भांड्याला खाली लागणार नाही.

एकदा हवा असलेला घट्टपणा आला की, गॅस बंद करावा. त्यामध्ये वेलदोड्याची पूड व सुक्या मेव्याचे (काजू-बदाम) तुकडे घालावे. आवडत असल्यास गुलाबपाणी घालावे.

आवडीप्रमाणे गरम किंवा थंड पनीर पुडिंगचा आस्वाद घ्यावा.

टीप: Whole Milk ऐवजी Half and Half वापरले तर पुडिंग लवकर घट्ट होते. पनीर जर घरी बनवलेले असेल तर ते घेऊन आणि पाणी निचरून घेणे आवश्यक आहे.