MMC 2021 Diwali Celebrations

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

“सोनपाऊली आली दिवाळी
म्हणे मी तर उत्सवांची राणी..”
 
काय मंडळी, तुम्ही पण आतुरतेने वाट पहाताय ना दिवाळीची..!
 
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, नवचैतन्याचा बहर. सुगंधी उटण्याचं स्नान, नवीन कपडे परिधान करून मिरवणं,  सुग्रास फराळाची रेलचेल, रांगोळ्यांची मखमली चादर, फटाक्यांची आतशबाजी, मातीच्या सुबक सुंदर पणत्या आणि आकाशकंदील/चांदण्यांच्या प्रकाशात तेजाळून उठणारी पहाट तसेच तिन्हीसांज.
असं सारं असलं तरी इथे आपण आपल्या मातृभूमीपासून,आप्त स्वकीयांपासून दूर आहोत, त्यांना भेटू शकत नाही ही हुरहूर प्रत्येकाच्या  मनी असतेच.  
 
त्यातच गेले वर्षभर सारंच चित्र बदलून गेल्याने प्रत्यक्ष भेटीदेखील दुर्मीळ झाल्या.
 
हे सारे लक्षात घेऊनच आपणा सर्वांना थोडा विरंगुळा मिळावा, मित्रपरिवाराला भेटून ह्या दिवाळीचा आनंद लुटता यावा ह्या  उदात्त हेतूने महाराष्ट्र मंडळ शिकागो २०२१, ‘यल्लो बॉक्स थिएटर’ नेपरवील या ठिकाणी, दिनांक १३ नोव्हेंबर, शनिवारी  एक विशेष कार्यक्रम  सादर करणार आहे.
 
आपले  १०० च्यावर स्थानिक कलाकार सर्वांचं  निखळ मनोरंजन करणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत, तुम्ही सारे देखील तयार रहा पहायला आणि करायला  
” धिनक धीं धा “
 
 तसेच ५ ते ११ वयोगटाच्या लहान मुलांसाठी StemShala तर्फे लेगो वर्कशॉप आयोजीत केले आहे, त्यामुळे मुलांची मज्जा आहे.
 
 आनंदाचा मार्ग पोटातून जातो हे आम्ही जाणतोच, त्यामुळे 
दिवाळीचा खमंग, खुसखुशीत फराळ आणि  सुग्रास भोजन  ह्या शिवाय हा  कार्यक्रम पार पडणे तर केवळ अशक्यच.
 
जिभेवर रेंगाळणारी  रूचकर मेजवानीची चव अन् एकूणच सोहळ्याच्या गोड आठवणी  ह्यामुळे आपली  दिवाळी संस्मरणीय ठरेल हे नक्की.
 
मोठ्या जल्लोषामध्ये ही दिवाळी साजरी करण्याचा मानस आहे, अर्थातच त्यासाठी आपल्या सारख्या रसिकांचे  प्रोत्साहन आणि मोठ्या संख्येने उपस्थिती ह्यांची जोड असणे फार महत्वाचे आहे.
 
चला तर मग तयारीला लागा, तारीख नोंदवून ठेवा. लवकरच भेटू , दीपावलीचा आनंद लुटू. 
 
तिमिराकडून तेजाकडे वाटचाल करत, आपणा सर्वांची दिवाळी उत्साही, आनंदमयी व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना!

Program Tickets prices are as below. Click on “Buy Now” button  to buy tickets for the event. Please select seats from seating map and appropriate babysitting options. 

Walk-in are always welcome. Walk-in tickets are $5 more than what’s mentioned in above table for respective categories.
 

Tickets OptionsPrices
Non-members Premium Seating (Adults 12+ Years)$40
Non-members Premium Seating (Kids 5-12 Years)$40
Members Premium Seating (Adults 12+ Years)$30
Members Premium Seating (Kids 5-12 Years) $30
  
Non-members Regular Seating (Adults 12+ Years)$30
Non-members Regular Seating (Kids 5-12 Years) $30
Members Regular Seating (Adults 12+ Years) $20
Members Regular Seating (Kids 5-12 Years) $20
  
Non-members Kids Babysitting (Ages 5-12 Years) $20
Member Kids Babysitting (Ages 5-12 Years) $10
  
Non-Member/Member Kids with No Seating (Under 5 Years) $0


Important COVID-19 related notice – 

Please note any interaction with the general public poses an elevated risk of being exposed to COVID-19 and we cannot guarantee that you will not be exposed while in attendance at the event. MMC 2021 and Yellow Box are not responsible for the health and safety of this event. We encourage you to follow the organizer’s safety policies, as well as local laws and restrictions.
Please follow all the social distancing guidelines as per CDC recommendations for Covid-19.