नमस्कार मंडळी,
भगवान शंकराच्या पूजन व नामस्मरणाने सामान्य जीव शिवस्वरूप झाल्याच्या अनेक कथा आपण सर्वांनी ऐकल्या आहेत. सोमवार दिनांक २८ फेब्रुवारीला रात्री ८:००-९:०० महाराष्ट्र मंडळ शिकागो अध्यात्मपीठ सर्व सभासदांसाठी खास शिवपूजन व रुद्राभिषेक करणार आहे . तरी सर्वांनी ह्या विशेष सेवेत झूम लिंकद्वारे सहभागी होऊन ह्या प्रसन्न वातावरणाचा अनुभव नक्की घ्यावा ही विनंती.
प्रस्तुत कार्यक्रम महाराष्ट्र मंडळ शिकागो च्या YouTube channel वरून थेट प्रक्षेपित करण्यात येईल.
https://youtube.com/c/MaharashtraMandalChicago
🚩ॐ नमः शिवाय🚩