🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
नागपंचमी, मंगळागौर, राखीपौर्णिमा अशा सणांची उधळण करणारा श्रावण मास बघता बघता सरला अन् भादवा, अहो, ‘भाद्रपद’ आला. नकळतच आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पांच्या आगमनाची वाट पाहणारी मनं प्रफुल्लित होऊ लागली.
गेले कित्येक महिने जगावर ओढवलेल्या आरोग्य संकटातून जरा जरा सावरू पहाणारे आपण सारेच ह्या विघ्नहर्त्याच्या सेवेसाठी तयारी करु लागलो.
अहो, आठवतंय ना, सर्व समाजाने एकत्र यावे या एका उदात्त हेतूने लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरू केला, तोच वारसा आणि हेतू मनी बाळगून , ‘महाराष्ट्र मंडळ शिकागो २०२१’ च्या कार्यकारिणीने बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याचे योजिले आहे. जेणेकरून इथे आपणां सर्वांना हा उत्सव एकत्रितपणे साजरा करता येईल.
(अर्थातच करोना प्रतिबंधक सगळे नियम तसेच अटी ह्यांचे १००% काटेकोर पालन करूनच)
स्थळ :— हाॅटेल बिग सुचीर, डाऊनर्स ग्रोव्ह. 1734 Ogden Ave, Downers Grove, IL, 60515
तरी बाप्पांच्या दर्शनाला येऊन, त्या विघ्नहर्त्याचे आशीर्वाद घ्यावेत यासाठी आपणां सर्वांना हे आग्रहाचे निमंत्रण आहे.
चला, तर मग सारे मिळून आपल्या लाडक्या दैवताला नमन करू आणि सर्व जनमानसाला आनंद, सुखसम्रुद्धी, आणि चांगले आरोग्य लाभो, तसेच सर्व संकटांमधून मुक्तता व्हावी यासाठी प्रार्थना करू.
आयोजनाची आकर्षणे व अटी पुढीलप्रमाणे :
श्रीगणपती महापूजा व आरती: दुपारी १० वाजता.
उपस्थितांना दर्शन व प्रसादाचा लाभ : दु. १:३० ते ३
विसर्जन: दु. ३ वाजता.
१) पूजास्थळी ढोलताशा झांज लेझीम पथकाचे बहारदार सादरीकरण दु. २:४५ वाजल्यापासून सुरू होईल.
२) सध्याचे COVID प्रतिबंधक नियम लक्षात घेता प्रत्येकाने या ठिकाणी दिलेल्या लिंकवर नोंदणी करून अगोदर वितरित झालेल्या वेळेतच (time slots) दर्शन घ्यावे अशी विनंती.
३) प्रत्येकाला मास्क घालणे आणि आणि सामाजिक अंतर पाळणे( social distancing) बंधनकारक राहील.
४) जागोजागी sanitizers उपलब्ध असतील.
हे सगळे प्रतिबंधात्मक उपाय यशस्वी होण्यासाठी आपले सहकार्य मोलाचे आहे.
चला तर मंडळी,सोशल डिस्टन्सिंग पाळत का होईना पण मनांना जवळ आणणारा हा उत्सव साजरा करण्यासाठी आपण लवकरच भेटू या .
“गणपती बाप्पा मोरया”
If you are not comfortable to come out in person for Darshan, please visit MMC Youtube and MMC Facebook to watch Live.
Important notice regarding COVID-19: Please note any interaction with the general public poses an elevated risk of being exposed to COVID-19 and we cannot guarantee that you will not be exposed while in attendance at the event. MMC 2021 and Big Suchir are not responsible for the health and safety of this event. We encourage you to follow the organizer’s safety policies, as well as local laws and restrictions.
Eventbrite website is used for convenience to track the temple appointments for devotees due to Covid restrictions. Please follow all the social distancing guidelines as per CDC recommendations for Covid-19.
The devotees are requested to visit MMC 2021 Shree Ganapati Mahapuja during their allocated time only.
गणपती बाप्पा मोरया!
श्रीगणेशाला वंदन करून महाराष्ट्र मंडळ शिकागो आपल्यासाठी खास कार्यक्रम घेऊन येत आहे. विघ्नहर्ता, आपल्या संकटाचे निवारण करणारा गणपती, लवकरात लवकर आपल्या सर्वांवरचं करोनाचं संकट दूर करो हीच प्रार्थना!
आपल्यावर असलेले निर्बंध लक्षात घेऊन, मंडळाने पुन्हा एकदा ॲानलाईन कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला आहे.
१७ सप्टेंबर रोजी, डॉ. गौरी कानिटकर आणि डॉ. संदीप अवचट घेउन येत आहेत “ज्योतिष शास्त्राकडून मानस शास्त्राकडे”
१८ सप्टेंबर रोजी, BMM शिकागोचेच कलाकार येणार आहेत ‘येनाराय येणाराय’ हे भन्नाट नाटक
आणि इतर काही कार्यक्रमांचा आनंद घेता येईल.
चला तर मग, बाप्पांच्या आगमनाच्या तयारीला लागू या!