मार्च महिना चालू झाला, मी दिवस मोजत होते आमच्या स्पेनच्या ट्रिपचे. केतकीला परत भेटायचे. करोना हा शब्द ऐकू येत होताच तोपर्यंत अचानक युरोप ट्रॅव्हलवर निर्बंध आणल्याची बातमी आली
ट्रिप राहिली बाजूला, आता केतकी कधी घरी येतेय असं झालं. विमानतळावर गेले तर सगळे लोक सजलेले दिसत होते, २०२० वर्षाचा दागिना सहज मिरवत होते, प्रथमच बघितला हा दागिना!
दोन दिवसातच परिस्थिती किती गंभीर झाली आहे ते लक्षात आलं. आमची एक शेजारीण, जी हॉस्पिटलमध्ये काम करते तिची नम्र विनंती वाचली, मास्कची तात्काळ गरज आहे. आणि बाहेर कुठेही ते उपलब्ध नव्हते.
मी माझ्या मैत्रिणी, ज्या शिवणकाम करतात त्यांना विचारलं, मास्क शिवायची इच्छा आहे का? आपण frontline workers साठी देणगी म्हणून बनवूया.
ठरलं मग, आम्ही सगळ्यांनी ही मोहीम अगदी उत्साहानी सुरु केली. किती मोठा, आणि कसा करायचं ते ठरवलं आणि सगळ्यांनी मास्क बनवणं चालू केलं. जसे मास्क बनू लागले, तसा आत्मविश्वास वाढला आणि एक प्रकारचा जोश निर्माण झाला.
मग आम्ही डॉक्टर्सना पण मास्क पुरवायचं ठरवलं.
ह्या उत्साहाबरोबर काही कठीण समस्याही उभ्या राहिल्या, इलास्टिक मिळेना, सुती कापड पण नाही, आणि दुकाने बंद. पण सगळ्या आमच्या टीमने युक्ती लढवली. T-shirt च्या दोऱ्या बनवल्या, आणि नव्या कोऱ्या चादरी, देणगी म्हणून आमच्या समर्थकांनी पुरवल्या.
अश्या अडचणींचा डोंगर पार पाडत आम्ही तब्बल तीनशेपन्नास (३५०) मास्क केले. आमच्या सगळ्या मास्क करणाऱ्या आणि आम्हाला देणगी देणाऱ्या सर्व देणगीदारांचे आणि आम्हाला ही संधी दिल्याबद्दल सर्व डॉक्टर्सचे खूप आभार!
मास्क बनवणारी आमची टीम आणि आमचे देणगीदार – अमित रोग्ये, अनिता नावकल, अनुपमा बुझरूक, दीपाली लांडे, हर्षदा सावंत, इंदर कौर, संगीता कडकोळ, सावित्री सुतार, शुक्ला जोशी, तनुजा पोतदार, वैशाली गवाणकर, वैशाली राजे, मृणाल जोगळेकर, रश्मी डिसिल्वा, संगीता चव्हाण, सरिता साळगांवकर, सुचेता अकोलकर, सुपर्णा थत्ते!
डॉक्टर्स – डॉ. वर्षा सांभारे, डॉ. शुभदा लवांडे, डॉ. आसावरी जव्हेरी, डॉ. अंजली खेर, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. मेधा अमीन, डॉ. ज्योत्स्ना देशपांडे, डॉ. डेना गार्सिया
शुक्ला क्षीरसागर-जोशी Naperville, IL |