L is Lockdown for us, L is LEGO for you!!

प्रिय प्रिशा,

लाॅकडाऊन! आज मागे वळून बघितले तर जाणवते की कितीतरी गोष्टी आपण एकत्र केल्या. आपल्याला खूप खूप फॅमिली टाईम मिळाला. ज्याला लोक क्वॉलिटी टाईम म्हणतात, तसाच वेळ आपण तिघांनी गेल्या चार महिन्यात एन्जाॅय केला. आठ वर्षांपूर्वी जेंव्हा तू आमच्या जगात आली, त्यावेळचा काळ आठवला. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण पूर्ण वेळ एकत्र असायचो. फक्त एवढाच फरक आहे की तेंव्हा तुला बोलता येत नव्हते आणि आता आम्हाला तुझे बोलणे बंद करता येत नाही. What do we do today? हा तुझा अगदी आवडीचा प्रश्न झाला आहे. 

LEGO Robotics हा तुझा आवडीचा विषय. आधी तू फक्त LEGO उपयोग करुन कित्येक प्रतिरूप बनवायचीस. पण ह्या लाॅकडाऊनच्या काळात तुझी झेप LEGO Machines आणि Programming पर्यंत पोहोचली आहे. तीन महीन्यात तब्बल १५-२० चालती बोलती प्रतिरुप बनवण्यात तुला यश आले आहे. त्यामध्ये पुलींग ट्रक, अम्युझमेंट पार्क राईड, डरकाळी फोडणारा सिंह, डराव डराव करत चालणारा बेडूक, चिवचिवाट करणारी चिमणी, सॅंटाक्लाॅज आणि त्याची पळणारी बग्गी, हळूहळू चालणारा सुरवंट, बांधकामातील क्रेन आणि अजुन खूप काही. तुझी प्रगती आणि आनंद बघुन आम्हाला तुझा अभिमान आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहा हीच शुभेच्छा आणि हाच आशिर्वाद आम्हा मायबापाकडुन. 

आई आणि बाबा!

C:\Users\shiprasad\AppData\Local\Microsoft\Windows\INetCache\Content.Word\WhatsApp Image 2020-07-04 at 9.57.40 AM (1).jpegC:\Users\shiprasad\AppData\Local\Microsoft\Windows\INetCache\Content.Word\WhatsApp Image 2020-07-04 at 9.57.38 AM.JPEG
C:\Users\shiprasad\AppData\Local\Microsoft\Windows\INetCache\Content.Word\WhatsApp Image 2020-07-04 at 9.57.40 AM.JPEGC:\Users\shiprasad\AppData\Local\Microsoft\Windows\INetCache\Content.Word\WhatsApp Image 2020-07-04 at 9.57.39 AM.JPEG

प्रसाद अथणीकर
Naperville, IL