Sankrant 2019

मंडळी,

सूर्याच्या मकर राशीत होणाऱ्या संक्रमण काळाला मकरसंक्रांत म्हणतात, याच कालावधीत दिवस हळूहळू मोठा होत जातो. याच काळात दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. आपल्या संस्कृतीत ऋतुमानानुसार काही पदार्थ केले जातात. संक्रांतीच्या काळात वातावरणातील गारव्यामुळे , शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहारात समाविष्ट केले जातात. बाजरीची भाकरी, तिळगुळाचे लाडू, भोगीची भाजी असा खास बेत या दिवशी केला जातो. वर्षभरातील कडवटपणा ,दुरावा “तिळगुळ” देऊन मिटवला जातो. तसेच या काळात स्त्रिया हळदी कुंकू आणि वाण देऊन एका प्रकारे पुढच्या विविध सणांची नांदीच करून देतात. भारतात साजरा होणारा हा सण, भारताबाहेरही उत्साहाने साजरा होतो. प्रियजनांच्या भेटीसाठी विविध मंडळे मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करतात, महिला उत्साहाने काळ्या साड्या नेसून हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात.

महाराष्ट्र मंडळ शिकागो ने ही परंपरा गेली 50 वर्ष जपली आहे. तीच परंपरा जपत या वर्षी मकरसंक्रांत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र मंडळ शिकागो आपल्या सर्वांना 19 जानेवारी 2019 रोजी होणाऱ्या सोहळ्यासाठी आग्रहाचे निमंत्रण देत आहे. या वर्षीच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण डॉ मृदुला दाढे जोशी यांचा सुगम संगीतावर आधारित कार्यक्रम असणार आहे.

डॉ मृदुला दाढे जोशी गेले 30 वर्षाहून अधिक काळ सुगम संगीताच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी संगीतात M A हे विशेष प्राविण्य मिळवून केलं असून , 2010 मध्ये संगीतकरांच्या सिनेसंगीतातील प्रयोगातील योगदान या विषयात डॉक्टरेट मिळवली. 1986 पासून त्यांनी विविध शोज केले मृदुल स्वरांनी, अक्षय गाणी, ओंकार स्वरूप( सुरेश वाडकर) , स्वरआशा ( आशा भोसले), स्मरणयात्रा (जागतिक मराठी परिषद 1991) ही त्यातली काही उल्लेखनीय उदाहरणे आहेत. तसेच त्यांना चतुरंग गौरव पुरस्कार, अभिजात कला गौरव पुरस्कार, vocational excellence award यांनी सम्मानीत केले गेले आहे.  गेली दहा वर्षे त्यांनी जवळजवळ 125 शिष्यांना सुगम संगीताचे प्रशिक्षण दिले आहे.

शिकागो महाराष्ट्र मंडळ सहर्ष सादर करत आहे “मृदुल स्वर” हा श्रीनिवास खळे, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर ते आजच्या संगीतकरांचे आस्वादक विश्लेषण करणारा सुगम संगीताचा कार्यक्रम

दिनांक १९ जानेवारी २०१९

स्थळ   येलो बॉक्स , नेपरविल

कार्यक्रमाची रूपरेषा:

Activity
Timelines
Check-in / Registration“Haldi kunku” and “vaan” 11:00 am to 12:30 pm
Lunch 11:30 am to 1:00 pm
MMC dance team performance“Marathi shala” kids performance
1:30 pm to 2:00 pm
“Maagova” with Narendra Kale
2:00 pm to 2:30 pm
“Mrudul Swar” by Dr. Mrudula Dadhe-Joshi
2:30 pm to 4:45 pm
STEM activities for kids
2:30 pm to 4:30 pm