Makar Sankrant Event 2022!!

मंडळी, ‘संक्रमण व्याख्यानमाला’ अगदी जवळ येऊन ठेपली आहे. उत्तमोत्तम वक्त्यांची व्याख्यानं ऐकण्याची ही सुवर्णसंधी आहे.

ही व्याख्यानं ऐकण्यासाठी आणि वक्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी, ह्या कार्यक्रमाची तिकिटं काढणं गरजेचं आहे, कारण ह्यापैकी कुठलीही व्याख्यानं, महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

चला तर मग, आजच तिकीट काढा. काही मदत लागल्यास, कार्यकारिणीला कळवा.
Email: Karyakarini@mahamandalchicago.org

या व्याख्यानमालेतील सुप्रसिद्ध वक्ते आणि त्यांच्या व्याख्यानांचे विविध विषय खालीलप्रमाणे:

क्र व्याख्यानाचा विषयवक्तेदिवस व दिनांकवेळ (US CST)
द्रौपदी वस्त्रहरण खरंच झाले का? श्री. निलेश ओकशनिवार, १५ जा. २०२२ सं. ७ – ९
अपरिचित रामायणश्री. सच्चिदानंद शेवडेरविवार, १६ जा. २०२२सं. ७ – ९
जीवनासाठी शिक्षण कसे देता येईल? महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंगशुक्रवार, २१ जा. २०२२सं. ८ – १०
स्वामी विवेकानंदांचा शिकागोमधील सर्वधर्म परिषदेतील दिग्विजयविद्यावाचस्पति गुरुदेव श्री. शंकर अभ्यंकरशनिवार, २२ जा. २०२२सं. ७ – ९
मेघदूत रसास्वादसौ. धनश्री लेलेरविवार, २३ जा. २०२२सं. ७ – ९

महाराष्ट्र मंडळ शिकागोचे वार्षिक सभासदत्व (Annual Membership) किंवा आजीव सभासदत्व (Life Membership) – विविध प्रकार, त्यातील सवलती आणि इतर तपशील या ई-मेल सोबत जोडले आहेत, तेही अवश्य पहावेत. काही प्रश्न अथवा सूचना असतील, तर महाराष्ट्र मंडळाच्या वेबसाईटला जरूर भेट द्यावी (https://www.mahamandalchicago.org/registration/) किंवा आपण कार्यकारिणीला थेट ईमेल पाठवू शकता.
Email: Karyakarini@mahamandalchicago.org

आपण सर्वजण, महाराष्ट्र मंडळाचे सभासद बनून ह्या सर्व उपक्रमांचा लाभ घ्याल अशी आमची खात्री आहे. 

बहुत काय लिहिणे? कळावे, लोभ असावा ! 

सस्नेह धन्यवाद,
MMC 2022 कार्यकारिणी