मी संपदा थत्ते. व्यवसायाने मी बरीच वर्षे फिझिकल थेरपिस्ट असिस्टंट आहे. त्याचबरोबर मी YMCA मध्ये ग्रुप फिटनेस चे वर्ग घेते. कोविड १९ च्या काळात मला नवीन नोकरी मिळाली. मी एका short term rehab facility साठी काम करतेय. कोरोनाच्या महामारीमुळे माझ्या कामाच्या स्वरूपात खूप बदल झाले. सध्या कामावर पीपीई (personal protective equipment) घातल्याशिवाय पेशंटला ट्रीट करता येत नाही. खबरदारी म्हणून गॉगल्स, गाऊन, फेस मास्क, हेअर नेट,
बुटीज, आणि ग्लोव्हज घालून काम करणे खूप त्रासदायक होते. ग्लोव्हजमुळे कॉम्प्युटरवर काम करणे कठीण होते. मास्क मुळे घाम येतो. पेशंटला आमचा चेहरा दिसत नाही की आवाजही ऐकू येत नाही. सारखे सारखे हात धुवून हात कोरडे होतात. पण हे सगळे सोपस्कार करताना पेशंटची आणि स्वतःची सुरक्षितता महत्वाची असते. आणि सरतेशेवटी पेशंट बरा होऊन घरी निघाला की खूप छान वाटते. कष्टाचं चीज झाल्यासारखे वाटते. घरी आल्यावर घरच्यांची सुरक्षितता पण महत्वाची असते. माझे कपडे वेगळे धुवावे लागतात. पण हळूहळू हे सगळे अंगवळणी पडत चाललंय.
माझ्या खाजगी आयुष्यात पण कोरोनामुळे खूप फरक पडला आहे. सुरवातीला माझ्या कामावर पेशंटला यायला मनाई होती. त्यावेळी मला खूप मोकळा वेळ मिळाला. कामावर जायचे नव्हते त्यामुळे घरात बसायची सवय नसलेली मी अचानक घाबरून गेले. पहिले काही दिवस मस्त झोप काढली पण मग त्याचा पण कंटाळा आला. माझ्या मुलीची शाळा बंद झालेली. मग अनुषा आणि मी सायकल चालवायला जाऊ लागलो. कधीतरी लांब चालायला जायला लागले. रोज weights च्या exersises करू लागले. नवीन नवीन पाककृती करायला लागले. zoom कॉल्स वरून मैत्रिणींशी गप्पा मारू लागले. भारतात असलेल्या बहिणींशी व्हाट्स अँप वरून संवाद साधू लागले. एक नवीनच आयुष्य अनुभवत होत होते मी. सुरवातीला वाटलेले तेवढे कठीण आता वाटत नव्हते. हा काळ सुसह्य होण्यासाठी माझे कुटुंबीय आणि माझा मित्र परिवार यांची मला खूपच मदत झाली. आज पुन्हा मी कामावर जायला लागलेय. आणि कुठेतरी तो मोकळा वेळ मिस करतेय.
संपदा थत्ते Naperville, IL |