पुन्हा धर्म जागृती

Covid and related shutdown ची चाहूल फेब्रुवारीपासून सुरु झाली. सुरुवातीचे थोडे दिवस आळस एन्जॉय करण्या मध्ये कसे गेले ते काही कळले नाही. दिवसभर office (remote) working आणि नंतर lock-down special menu चालू झाले, impromptu activities मध्ये फक्त पोटोबा आणि on-demand tv programs नी  वजन वाढू लागले. USA मधल्या active cases चे आकडे वाढू लागल्याने, मित्रमंडळी, नातेवाईक सर्वांचे फोन-कॉल्स सुरु झाले. ह्या सर्व गोष्टीमुळे जबाबदारीची जाणीव पुनः झाली. नव्याने वाचन सुरु झाले, काही you-tube वरील व्हिडिओ बघून study सुरु झाला. 

त्यामधून “धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः” ।तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत्।(Dharma destroys when abandoned. Dharma, when upheld, protects.) हा श्लोक समजण्याचा आणि मला समजलेलं माझं बाळबोध interpretation मी list down केले. आणि त्या प्रमाणे काही activities केल्या त्याचाच हा आढावा… 

My dharma as individual – निरोगी शरीर आणि चित्त शांत राहावे, म्हणून योग व व्यायाम सुरु केले, दररोज ठराविक वेळ शारीरिक स्वास्थ्यासाठी राखीव ठेवला. मला मूर्तिकलेचा छंद आहे, तब्बल २५ वर्षानंतर पुनः गणपती बाप्पाची मंगलमूर्ती घडवण्याचा मुहूर्त साधला.

My dharma as parent – Online school, zoom meetings, remote dance क्लासेस, ह्या सर्व गोष्टी मुलींसाठी तश्या नवीन होत्या. त्यांनाही extra मदतीची गरज होती. मग मुलांसाठी काही interactive routines set करण्यामध्ये मदत केली, त्यांचा online क्लासेससाठी guidance time सुरु केला. दैनंदिन घरटी काम आणि त्याचं प्लॅनिंग ह्या सर्व गोष्टी मध्ये मुलांना engage करायची संधी मिळाली.  त्या निमित्ताने त्यांच्यावर lock-downचा कमी इफेक्ट व्हावा हीच इच्छा होती.

My dharma as city resident – आपण जरी lock-down मध्ये असलो तरीही school district, city councils/ first responders/ police and firemen ह्या सर्व मंडळीना काम करणे अनिवार्य आहे. School district ने मदतीची हाक टाकली असता IPSD 204 साठी एक Fundraiser राबवला, “SUSPEND-A-MEAL”. मित्रमंडळीनी सढळ हस्ते मदत केली. ‘Hindu Swayamsevak Sangh’ आणि ‘Sewa international’ ह्या संस्थांशी निगडित असल्यामुळे दर आठवड्याला काही activities  चालू होत्या. त्याअंतर्गत Masks donation drive, meal train, food donation drives, general fundraisers असे volunteeringचे काम अजूनही चालू आहे.


My dharma as mentor – कर्मभूमीमधील काम चालू असताना मायदेशी, भारतात, काही कार्यक्रमाची virtual volunteering/ mentoring करायची संधी मिळाली. शाळेमधील मित्रमंडळी, जुना ऑफिसवर्ग अश्या बऱ्याच दुरावलेल्या  सवंगड्यांबरोबर काही उपक्रम राबवले. 

Covid-19 ही व्याधी आपल्याला इतर माणसांपासून दूर ठेवतेय, in-person socialization जरी avoid करायचे असले तरी कमी प्रमाणात किंवा virtual mode मधून आपण बरेच उपक्रम / कार्य करू शकतो ही जाणीव covid-19 ने नव्याने करून दिली. पारिवारिक virtual meetings, कट्टा gatherings, entertainment प्रोग्रॅम्स, Drive -in -birthday parade, online संगीत संमेलन, एवढंच काय तर लग्नं पण अनुभवायला मिळाली. मला खात्री आहे Covid-19 ने आपबांधवांमध्ये नव्याने, माणुसकीची आणि सनातनी स्वास्थ्य रूढींनीच धर्मजागृती करून दिली.


मंदार पित्रे 
Naperville, IL