ते दिवस कोरोनाचे

नमस्कार, मार्च महिन्यापासून सगळीकडे उलथापालथ झाली आहे. अचानक जसे काही जगच बंद पडलं आहे. स्वप्नात जे वाटले नव्हते, ते आता सत्यात उतरलं आहे. घरामधून बाहेर पडणंसुद्धा बंद झाले आहे. तर अशा परिस्तिथीमधे घराच्या चौकटीतून उंबरठ्या बाहेर न जाता, हा काळ उपयुक्त कसा करता येईल हा मोठा गहन प्रश्न मला वाटतं सगळ्यांनाच पडला असेल

मी जुन्या नव्या आवडी जोपासायला सुरुवात केली. नाचायची आवड असल्याने, कोरोना आधारित लावणी नृत्य दिग्दर्शन व नृत्य केलं. MMC Dance team साठी ‘Tribute to Madhuri Dixit’  संकल्पना व त्यावर नृत्य बसवलं. नवीन आवड म्हणजे चित्र काढणे. सध्या वारली आर्ट स्वतः शिकत आहे. ऑनलाइन क्लास मधून नवीन नवीन Technology( माझ्या कामा संदर्भातली) शिकत आहे. शिवाय आता वाचनाला (तसा बराच) वेळ मिळतो- सध्या वाचलं व आवडलं ते पुस्तक म्हणजे –   Becoming by Michelle Obama.


प्रियांका पारेख
Aurora, IL