जस्ट लाईक गुड ओल्ड डेज!

सद्य कोविड-१९ च्या परिस्थितीतली, सिल्वर लायनिंग म्हणजे आपली मुले WFH (वर्क फ्रॉम होम) असल्यामुळे आपल्या घरी आहेत. अगदी शाळा आणि कॉलेज सारखे दिवस. Just like good old days. घर कसे भरलेलं वाटते…..दिवसभर घरीच. ऑफिस, मग जेवणखाण, बॅक यार्डाची सफाई, पत्ते, कॅरम, ड्रम्स आणि हो.. डिस्कशन आणि अर्ग्युमेंट, तेही millenials बरोबर (म्हणजे cpa  असाल की CEO असाल, पण कच नक्की आपणच खाणार हे गृहीत!). तरीही कोविड-१९ च्या निमित्ताने पुढच्या पिढीचे नवीन विचार-आचार शिकायची आणि समजून घ्यायची, तसेच आपले  काही जुने विचार-आचार ‘कसे ओल्ड वाईन  इन न्यू बॉटल आहेत” असे समजावयाची संधी मिळाली. पॉलिटिक्सपासून ते आर्टीफिशियल इंटेलिजन्स पर्यंत चर्चेचे विषय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नवीन-नवीन apps.

 

तर अश्या नवीन आचारांच्या देवाण-घेवाणीत, house -vacuuming  हे मात्र आजही ‘तू तेरा रूम, मै मेरा रूम’ असेच आहे. जस्ट लाईक गुड ओल्ड डेज. पण कहानी में एक twist है !! 

रूम्बा (roomba) आणि त्याचा APP iRobot ! हे घरातले नवीन सदस्य. आईसाठी  प्रेमाने घेतलेली, तिचे काम आपल्या अपार्टमेंट सारखेच सोपे करण्यासाठी आमच्या मुलांची एक techy gift. 

नील आणि राधिका  धाडशीच म्हणायचे.  टेकसॅव्ही फायन्यानशीयल असले तरी gadgets  आणि apps  चे माझे अनेक किस्से ऐतिहासिक होतील असे आहेत. पण आता आईच आहे तर. ..  (eye roll). तर असे माझे  relearning , थोडेसे सेल्फ-लर्निंग आणि बरयाचश्या मुलांच्या instructions, त्याची ही कहाणी  . 

ट्रैनिंग हा प्रकार इंग्रजीत नील-राधिका-दीवंत ह्या त्रिकुटाच्या व्हाट्स-अँप वर घडला. 

राधिका: Reading the manual; involves downloading the app iRobot , that too on aai’s phone! म्हणजे हजार प्रश्न let us do it over the weekend when there is ample free time. 

नील: Tai, The entire first day aai spent following the Roomba from room to room in awe, fascination, and suspicion (in that order!).  had to tell her “Mom it is mapping and learning.”

नील: tai , showed  Aai how  to mark rooms ,schedule timings for cleaning on  the  app.  Midweek the Roomba on its own cleaned and quietly retreated to its home base docking station.  but now  Aai  is  panicking  and  asking तो रूम्बा नीट mapping  करत नाहीये सगळा एरिया कव्हर करत नाहीये आता कसं remapping  करायचे?  Now what  else to do?  

दीवंत: show Google and demos . 

नील: But  she is the old school techy, and wants to have “the best possible use with maximum coverage” with “the Highest Time efficiency”, and still suspicious. 

राधिका: So after much deliberations, discussions, and numerous arguments, Neil, I think the issue is  that Aai keeps changing the docking position… the Roomba cannot map the rooms and it gets confused. tell  her “Leave it alone!!!!” 

किती झाले तरी mapping  जमेना आणि मुलांची रूम काही स्वच्छ दिसेना… पूर्वीसारखे काहीतरी केले पाहिजे असा मी विचार करतच होते … leave  it  alone . ह्या वाक्याने डोक्यात प्रकाश पाडला … मुलांच्या खोलीत जायचे,  जातीने  त्यांच्या कुठल्याही सबबींना  न जुमानता आवरून घ्यायचे. मग काय …..  

App वगैरे आणि mapping च्या भानगडीत न पडता रुम्बा सरळ base सकट उचला आणि म्हंटले खोलीत नेवून  नीट  mapping  का करीत नाही ह्याकडे जातीने लक्ष घालते  …. कुठल्याही confusion ला न जुमानता!

नील: आई dont  tell  it  where  to  go just  start  the  app !!  

My dearest millennials च् techy  gift मी आजही  एक्सपर्टली वापरते  पण त्यांच्यातला APP  मात्र इतिहास जमा झाला बिचारा . It  really feels Just  like  good  old days !!! 


सुचेता अकोलकर
Aurora, IL