कोविड – १९ चे सावट पसरले जगावरती
नेहमी गजबजलेली, हादरली ही धरती;
सर्वत्र सोशल डिस्टंसिन्ग , घराबाहेर जाण्यास बंदी
तर देशा-देशात बेरोजगारी व आर्थिक मंदी ;
आता ऑफिसला जाण्याची चिंता नाही
परत घरी येण्याची घाई नाही;
दगदगीचे आयुष्य शांत झाले
आयुष्यात जणू एक मध्यांतर आले;
घरचा सहवास नेहमी वाटणारा हवाहवासा
आता मात्र वाटू लागला नकोसा;
कोविड – १९ ने सर्वत्र हाहाकार माजतोय
देवरुपी मनुष्य दिवस-रात्र , जीव वाचवतोय;
लॉकडाऊनमुळे प्रत्येकाला आलाय कंटाळा
चित्रकला, पाककला, नेटफ्लिक्स हाच आता विरंगुळा;
सुदैव-दुर्दैव म्हणावं, ज्यांना लाभला स्वर्गवास
एकच प्रार्थना, सुखरूप जाओ त्यांचा पुढचा प्रवास;
अनिकेत सावंत Hoffman Estate, IL |