नमस्कार मंडळी,
शिकागोसारख्या थंड हवामानाच्या शहरात उन्हाळा म्हणजे खऱ्या अर्थाने एक उत्सवच! या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आपल्या घरातील लहानग्यांनी धमाल केली असेल, खेळ, सहली, आणि आनंदात वेळ घालवला असेल, याची आम्हांला खात्री आहे!
आता मात्र सुट्ट्यांची सांगता होत असून, शाळा सुरू होण्याची वेळ आली आहे. आणि शाळा म्हटलं, की महाराष्ट्र मंडळ शिकागोची “शिकागो मराठी शाळा” —
इथे आहे मजा, धमाल, गोष्टी, गाणी, अभ्यास आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपल्या मराठी भाषा व संस्कृतीचे बीजारोपणच!
चला तर मग, आपण आणि आपल्या आसपासच्या कुटुंबांना प्रेरित करून अधिकाधिक मुलांना मराठी शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करू या. आपल्या सहभागाने आणि प्रयत्नांनीच आपल्या पुढील पिढीपर्यंत भाषा, संस्कृती आणि परंपरा अभिमानाने पोहोचतील.
मुलांच्या प्रवेशासाठी गुगल फॉर्मची लिंक सोबत दिली आहे — लगेच नोंदणी करा.
CMS Student Registration
Google Form Link:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdJ521wIcXhkj73EWV6BMBYwdfloA0bj8SWkQLDyB_Oo-UqiA/viewform?usp=header
सूचना किंवा शंका असल्यास, कृपया शाळेच्या कार्यकारी समितीशी संपर्क साधा:
१. कविता वाडकर
शाळा संचालिका
+1-224-386-4488
Email:-shaladirector.cms@mahamandalchicago.org
२. मयुरा देशपांडे
शाखा संचालिका – शॉम्बर्ग
+1-847-987-1715
३. निलेश अग्रवाल
शाखा संचालक – बफेलो ग्रुव्ह
+1-847-637-7890
अरुंधती जाधव
शाखा संचालिका – नेपरविल
+91-855-487-3138 (व्हॉट्सॲप)
चला, एकत्र येऊ या,
आपली भाषा – आपली संस्कृती – आपले सण पुढील पिढीकडे अभिमानाने सोपवू या!