💚💚💚💚Mental Health Awareness Month💚💚💚💚

💚💚💚💚💚💚💚💚💚💚

Maharashtra Mandal Chicago 2021 in collaboration with ANK ( Amazing Natkhat Kalaakars Whats app group – आमचा नादच खुळा) has organized a seminar regarding Mental health awareness.

मे महिना हा पूर्ण अमेरिकेत मानसिक स्वास्थ्य महिना समजला जातो.आपल्या समाजात ही या विषयाबद्दल काही संभ्रम असण्याची शक्यता आहे. त्याला अनुसरून मानसिक स्वास्थ्य या विषयी जाणून घ्यायला, सामील व्हा :
रविवार २३-मे-२०२१ दुपारी ४ ( सेंट्रल)
*विषयतज्ज्ञ आहेत – सौ. सोनाली गोरे
सोनाली ही लायसेंस्ड सायकोथेरपिस्ट असून अमेरिकेत प्रॅक्टिस करत आहे.

हा कार्यक्रम MMC YouTube, Facebook व Twitter वर Live होणार नसल्याने, ज्यांना ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा असेल त्यांनी कृपया मंडळाच्या कार्यकारिणीला (karyakarini@mahamandalchicago.org) संपर्क करावा.

मेंटल हेल्थ सेलेब्रेट करायला हिरवा रंग वापरतात. तर तुम्ही पण सर्व हिरवा रंग परिधान करून आलात तर दुधात साखरच!

मानसिक आरोग्य जागरूकता महिना

आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीने वर्षभराहून अधिक काळ आपल्याला भंडावून सोडलं आहे. घरातली आजारपणं, जवळच्या व्यक्तींना होणारा त्रास, भारतातील परिस्थिती, आपल्याला काहीच करता येत नाही ही सतत छळणारी भावना आणि त्यामुळे निर्माण होणारा तणाव, ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो हे नक्की. आपल्या शारीरिक आरोग्याबरोबरच आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं हे नेहमीच गरजेचं असतं पण सध्याच्या काळात तर त्याची अतिशय नितांत गरज आहे.

आपण आपली काळजी घेणं जसं गरजेचं आहे तसंच ह्या परिस्थितीत दुसऱ्यांकरता मदतीचा हात पुढे करणं पण गरजेचं आहे. आपण जरी त्या क्षेत्रात नसलो तरी एकमेकांची विचारपूस करणं, एकमेकांना मानसिक आधार देणं हे तर आपण नक्कीच करू शकतो.

जर तुम्हाला किंवा तुमच्या आप्तस्वकीयांना अशा प्रकारची मदत हवी असेल तर MMCला (karyakarini@mahamandalchicago.org) जरूर कळवा. आम्ही ती मदत देण्याच्या आटोकाट प्रयत्न करू.

मे महिना हा मानसिक आरोग्य जागरूकता महिना आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र मंडळ शिकागो आपल्यासाठी काही उपक्रम घेऊन येणार आहे. त्यांची माहिती लवकरच आपल्याला दिली जाईल.

सध्याच्या काळात स्वत: सकारात्मक राहणं जेव्हढं गरजेचं आहे तेव्हढंच ही सकारात्मकता इतरांपर्यंत पोचवणं पण गरजेचं आहे. आणि हे काम महाराष्ट्र मंडळ शिकागो अत्यंत नेटाने करणार आहे ह्याची तुम्ही खात्री बाळगा.

तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास कार्यकारिणीला संपर्क साधा. धन्यवाद!