👩‍👧‍👧👩‍👦MOTHER’S DAY👩‍👧👩‍👧‍👦

👩‍👧👩‍👧‍👦👩‍👦‍👦👩‍👧‍👧👩‍👦👩‍👧👩‍👧‍👦👩‍👦‍👦👩‍👧‍👧👩‍👦

Parampara MMC 2021 team celebrates Mothers Day by giving tribute to all Moms.

Please share your picture with your mother, your mother-in-law, your son or your daughter with us on WhatsApp (Ulka Nagarkar # (773) 961-4571). Alternatively, you can send your picture via email to karyakarini@mahamandalchicago.org. Please share your pictures by May 7, 2021.

We will make video with appropriate songs & release it on Mothers Day May 9, 2021.

Thank You!
Parampara MMC 2021 team

महाराष्ट्र मंडळ शिकागो २०२१ अन्तर्गत, “Chi Town अंगत पंगत” Food Team ‘Mother’s Day Special’चा आस्वाद घेण्यासाठी भेटुया ८ मे संध्याकाळी ६:०० वाजता (CST).

Watch it live on MMC Facebook, Twitter and YouTube

🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹

मानसिक आरोग्य जागरूकता महिना

आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीने वर्षभराहून अधिक काळ आपल्याला भंडावून सोडलं आहे. घरातली आजारपणं, जवळच्या व्यक्तींना होणारा त्रास, भारतातील परिस्थिती, आपल्याला काहीच करता येत नाही ही सतत छळणारी भावना आणि त्यामुळे निर्माण होणारा तणाव, ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो हे नक्की. आपल्या शारीरिक आरोग्याबरोबरच आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं हे नेहमीच गरजेचं असतं पण सध्याच्या काळात तर त्याची अतिशय नितांत गरज आहे.

आपण आपली काळजी घेणं जसं गरजेचं आहे तसंच ह्या परिस्थितीत दुसऱ्यांकरता मदतीचा हात पुढे करणं पण गरजेचं आहे. आपण जरी त्या क्षेत्रात नसलो तरी एकमेकांची विचारपूस करणं, एकमेकांना मानसिक आधार देणं हे तर आपण नक्कीच करू शकतो.

जर तुम्हाला किंवा तुमच्या आप्तस्वकीयांना अशा प्रकारची मदत हवी असेल तर MMCला (karyakarini@mahamandalchicago.org) जरूर कळवा. आम्ही ती मदत देण्याच्या आटोकाट प्रयत्न करू.

मे महिना हा मानसिक आरोग्य जागरूकता महिना आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र मंडळ शिकागो आपल्यासाठी काही उपक्रम घेऊन येणार आहे. त्यांची माहिती लवकरच आपल्याला दिली जाईल.

सध्याच्या काळात स्वत: सकारात्मक राहणं जेव्हढं गरजेचं आहे तेव्हढंच ही सकारात्मकता इतरांपर्यंत पोचवणं पण गरजेचं आहे. आणि हे काम महाराष्ट्र मंडळ शिकागो अत्यंत नेटाने करणार आहे ह्याची तुम्ही खात्री बाळगा.

तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास कार्यकारिणीला संपर्क साधा. धन्यवाद!