देवांचा देव महादेव

मार्च महिना सुरु झाला आणि कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम सुरु झालं. चार भिंतीच्या आत राहून स्वतःला  कामाव्यतिरिक्त व्यस्त कसं ठेवता येईल यासाठी डोकं विचार करू लागलं आणि मग घराबाहेर न पडता घरात असलेल्या वस्तूपासून काही करायचं ठरवलं. आता वेळच  वेळ असल्यामुळे ज्या गोष्टी नेहमीच्या कामामुळे राहून गेल्या किंवा खूप वर्षापासून केल्या नाहीत त्या करायचं ठरवलं. त्याच यादीमधून चित्रकला एक !!! 

२००६ साली मी आठवीत होतो तेव्हा शेवटचा ब्रश धरला होता आणि आज जवळ जवळ १५ वर्षांनी पुन्हा एकदा चित्र काढताना एक वेगळाच आनंद मिळाला. शाळेतल्या काही आठवणी ताज्या झाल्या. शंकराचे चित्र काढण्या मागे काही कारण होतं. असं म्हंटले जातं की ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता आहे तर विष्णू सृष्टीचा पालनकर्ता आणि शंकर तिचे संरक्षण करणारा आहे. यामुळेच शंकराला  ‘कैलास निवासी’ असे म्हटले जाते. ‘आशुतोष’ म्हणजे  तत्काळ संतुष्ट होणारे. शिव तसाच आहे. समुद्र मंथनात निघालेले विष स्वत: प्राशन करून जगाचे कल्याण करणारा. शिव हा परमात्मांपैकी एक आहे जो सृष्टीची निर्मिती, संरक्षण आणि परिवर्तन करतो. म्हणून या कोरोना ग्रस्त काळात हे शिव चित्र.


अनिकेत सावंत 
Hoffman Estate, IL