गुढीपाडवा नाट्यमहोत्सव २०२१

रंगदेवता आणि सर्व नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन! महाराष्ट मंडळ शिकागो, एप्रिल १७ आणि १८ ह्या तारखांना ,आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे, दोन दिवसांचा बहारदार डिजिटल नाट्यमहोत्सव!

ह्या नाट्यमहोत्सवात आपल्याला बघायला मिळणार आहेत दोन व्यावसायिक नाटकं. पहिल्या दिवशी, बृहन्महाराष्ट मंडळ नॅार्थ अमेरिका आणि महाराष्ट्र मंडळ शिकागो, आपल्यासाठी घेऊन येत आहेत, ओंकार कुलकर्णी लिखित आणि मंदार देशपांडे दिग्दर्शित, सुमीत राघवन आणि नेहा जोशी ह्यांच्या अभिनयाने नटलेली कलाकृती, ‘नॅाक नॅाक सेलेब्रिटी.‘

तर दुसऱ्या दिवशी कल्लोळ एंटरटेनमेंट आणि महाराष्ट्र मंडळ शिकागो ,आपल्यासाठी घेऊन येत आहेत, सुरेश जयराम लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित, विनोदाचे षटकार मारणाऱ्या कलाकारांचं, एक धमाल विनोदी नाटक, ‘लपंडाव.’

तर तारखा लक्षात ठेवा हं, एप्रिल १७ आणि १८ आणि लवकरात लवकर आपली तिकिटं बुक करा. 

The ticket prices for this event are as follows:

Package Price = Free

  • This is for anyone who has purchased any ‘package’ for 2021
  • Includes anyone who purchased Plus, Pearl/Moti, Ruby/Manik, Diamond/Hira or Emerald/Pachu package or upgrade for 2021

Member Price = $15

  • Anyone with MMC 2021 membership (annual or life) but not purchased any of the above packages

Non-Member = $20

  • Anyone who has not purchased MMC membership
  • Tip: Purchase MMC 2021 membership and save for this and future events!

Thanks for all the support ,

लवकरच भेटूया,

कार्यकारिणी,
महाराष्ट्र मंडळ शिकागो 2021