Home_old

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया , झळाळती कोटी ज्योती या…

नमस्कार मंडळी

दिवाळी म्हटलं की डोळ्यासमोर आपले बालपण उभे राहते. आकाशकंदील, मातीचा किल्ला, खमंग फराळ, नवीन कपडे,अभ्यंगस्नान, रांगोळी, आणि फटाके. अजूनही भारतात आणि परदेशात अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरी होते ती ही तेजाची न्यारी दिवाळी. महाराष्ट्रात दिवाळीचे विशेष महत्व आहे. दिवाळी पहाट हा विशेष कार्यक्रम गावागावातून साजरा केला जातो. उत्तम पेहरावात, नटून थटून स्त्री पुरुष भल्या पहाटे या कार्यक्रमाला हजेरी लावतात. शास्त्रीय संगीत, अभंग, भक्तिगीते, भावगीते या विविध गीतप्रकारांनी ही मैफिल सजलेली असते. मित्रांनो, महाराष्ट्र मंडळ शिकागो, १८ नोव्हेंबर २०१८ रोजी आपली पहाट मंगलमय करण्यासाठी घेऊन येत आहे संगीताची जुगलबंदी आणि विनोदी प्रयोग “उभ्या उभ्या विनोद”. संगीतावर आधारित कार्यक्रम सादर करणार आहेत मंजिरी वैशंपायन आणि जाई गरुड सोवनी मंजिरी वैशंपायन या जयपूर अत्रोली घराण्याच्या गायनाशी संबंधित शास्त्रीय शिक्षण घेतले आहे. गुरू शिष्य परंपरेतुन त्यांनी दोन दशकाहून अधिक काळ कै धोंडूताई कुलकर्णी यांचे शिष्यत्व पत्करले. त्यांना सूर सिंगार संसद तर्फे “सुरमणी” या पुरस्काराने सम्मानित केले आहे. त्यांनी स्वर साधना म्युझिक अकॅडमी ची शिकागो येथे स्थापना केली. जाई गरुड सोवनी या Milwaukee स्थित हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आहेत. भारतीय शासनाच्या शिष्यवृत्तीत त्यांना गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुल पद्धतीने शास्त्रीय संगीताचा अभ्यास करण्याची संधी मिळाली तसेच त्यांच्या गुरू आरती अंकलीकर टिकेकर याना अमेरिकेतील अनेक कार्यक्रमात साथ केली आहे. अमेरिकेतील विविध भागात त्या शास्त्रीय, सुगम संगीताचे शिक्षण देतात. उभ्या उभ्या विनोद आपल्या दैनंदिन जीवनातले अनुभव यावर हा कार्यक्रम आधारित आहे. तेव्हा वय वर्षे १० ते ११०, सगळ्यांनी एकत्र बसून बघावा असा कार्यक्रम आहे. एका वेळी एक व्यक्ती स्टेजवर येऊन १५/२० मिनिटं विनोद सांगते. कौस्तुभ सोमण , विनय देसाई आणि तनुजा शिंगणे हा कार्यक्रम सादर करतात. या कलाकारांची थोडक्यात ओळख अशी.. कौस्तुभ सोमण नखशिखांत पुणेकर. हा पुण्यातून बाहेर पडला तरी पुणेकर ह्याच्यातून बाहेर पडला नाही. एक ना धड.. हा ह्याचा गुणधर्म . Mechanical मधे bachelor’s , तिकडे रमला नाही म्हणून Robotics मधे मास्टर्स आणि तिकडेही रमला नाही म्हणून शेवटी सॉफ्टवेअर मधे स्थिरावला. DC मधे गेली ३-४ वर्ष नोकरी करतोय. ‘बसल्या बसल्या’ कंटाळा आला म्हणून ‘उभ्या उभ्या’ विनोदाला लागला. बघू आता, ह्याच्यात किती दिवस रमतोय? चित्रपटातून याचं डोकं आणि याच्या डोक्यातून चित्रपट कधीच बाहेर पडणार नाही अशी आमची खात्री आहे. चित्रपटाचं वेड इतकं आहे की कॅमेर्यातून Direct डब्यात गेलेले चित्रपटही तो पाहू शकतो. विनय देसाई वेळ जात नाही म्हणून पुस्तक लिहितो म्हणे. जन्माने पुणेकर आणि वाढलाय कोकणात. आधीच … काय ते म्हणतात ना? तसा गेली ३० वर्षं एकाच कंपनीत ‘जावा-जावा’ करत असतो. दोन पुस्तकं आली आहेत बाजारात. कधी लहान मुलांची नाटकं बसवतो, कधीतरी स्टेजवर पाणी आणणे पत्र टाकायचं काम देतात म्हणून स्वतःला कलाकार समजतो. हल्ली दिवसभर विनोद शोधत असतो आणि वेळ मिळाला तर सॉफ्टवेयर पण लिहितो म्हणे.. देव जाणे… तनुजा शिंगणे: बाई जातात व्यायामाला पण लक्ष सगळं विनोदाकडेच असतं… त्या व्यतिरिक्त काही काम करते कि नाही कोणास ठाऊक. तसेच पालकांना कार्यक्रमाचा आनंद घ्यावा यासाठी शिकागो महाराष्ट मंडळाने नेहमीप्रमाणेच या वेळी ही लहान मुलांसाठी Art4heart या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. 5 ते 11 वयोगटाच्या मुलांना यात सहभागी होता येईल. दिवाळी म्हटलं की फराळ आलाच, शिकागो महाराष्ट्र मंडळाने या वर्षीचा दिवाळी फराळ खास भारतातून आणला आहे तो कार्यक्रमाच्या वेळेस प्रत्येक कुटुंबाला देण्यात येईल. स्थळ : – Monty’s Elegant Banquets, 703 S York Rd, Bensenville, IL 60106 कार्यक्रमाची सर्वसाधारण रूपरेखा पुढीलप्रमाणे आहे सकाळी ८:३० – रजिस्ट्रेशन आणि नाश्ता सकाळी ९:०० ते ११:०० – दीपावली सूर प्रभात (मंजिरी वैशंपायन आणि जाई गरुड सोवनी यांची जुगलबंदी ) सकाळी ११:०० ते १२:३० – वार्षिक सर्वसाधारण सभा दुपारी १२:३० ते २:०० – स्नेहभोजन दुपारी २:०० ते ३:०० – मराठी शाळा आणि इतर मनोरंजनाचे कार्यक्रम दुपारी ३:०० ते ५:०० – उभ्या उभ्या विनोद संध्याकाळी ५:०० ते ५:३० संध्याकाळी ५:४५ – कार्यक्रमाची सांगता RSVP: http://www.mahamandalchicago.org या संकेतस्थळावर जोरात सुरु आहे. तरी आजच आपली जागा आरक्षित करा. Click HERE for RSVP. कार्यक्रमाचे तिकीट दर पुढील प्रमाणे असतील : Premium Seating (Members & Non-Members) : $50 (Gold Seating) Preferred Seating (Members & Non-Members) : $35 (Silver Seating) General Seating:

Members Non-Members
Adults $ 25 $ 30
Kids (Ages 5 to 12) $ 22 $ 27
Kids (Baby Sitting) $ 20 $ 25

जर आपणास ई-मेल आली नसेल तर karyakarini @mahamandalchicago.org ला ई-मेल पाठवावा. तसेच आपल्याला बुकिंग संदर्भात जर काही मदत हवी असेल तर सौ. उल्का नगरकर यांच्याशी ७७३-९६१-४५७१ या क्रमांकावर संपर्क साधावा.