2022 Events


‘मित्र’ आपल्या सोनसळी उन्हाची जादू पसरवत आला आणि निसर्गाचं सळसळणारं हिरवं चैतन्य जागं झालं. सगळीकडे सौंदर्याची, फुलांची रंगीबेरंगी पखरण झाली. असा निसर्गाचा सुंदर सोहळा सुरू असतांना कोणाचे बरं पाय घरात टिकणार?

अशा निसर्गाचा आस्वाद घेण्याची अजून एक संधी महाराष्ट्र मंडळ शिकागोने उपलब्ध करून दिली आहे, ती पिकनिकच्या निमित्ताने.

दिनांक- ९ जुलै २०२२
स्थळ – Schiller Woods Picnic Grove # 12 (https://goo.gl/maps/prjxMWFBYEoyTxPHA)
वेळ – सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत

कार्यक्रमाची रूपरेखा-
सकाळी १०.०० – ११.०० ब्रेकफास्ट
दुपारी १२:३० – २.०० जेवण
दुपारी ३:३० – ४.०० स्नॅक्स

चला तर, आपापल्या हॅट्स, सनग्लासेस, सतरंज्या, पाण्याच्या बाटल्या इत्यादी सामान गोळा करायला लागा, आणि पिकनिकची मजा लुटायला सज्ज व्हा.

तुमच्या मनात मागच्या वर्षीच्या पिकनिकच्या सुखद स्मृती रेंगाळत असतीलच! यावर्षी सुद्धा तशीच धम्माल करायचा बेत आयोजकांनी आखला आहे. पिकनिकची काही प्रमुख आकर्षणे –

  • आपला आनंद गाण्यांतून व्यक्त करायची इच्छा असेल तर karaoke उपलब्ध आहे
  • इच्छा असल्यास फ्लॅशमाॅब या नृत्यप्रकारात भाग घ्यायची संधी.
  • भेळ, टरबूज व अनेक चमचमीत पदार्थांचा उपाहार .
  • नेहमीप्रमाणे लंचसाठी सुग्रास आणि चविष्ट मेजवानी!
  • सर्व वयोगटांसाठी मनोरंजक आणि गमतीदार खेळ.

Karaoke आणि फ्लॅशमाॅबमध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल तर कार्यकारिणीशी संपर्क साधावा आणि आपले नाव नोंदवावे.
karyakarini@mahamandalchicago.org

चला तर मग, हसत खेळत, नाचत गात, मित्रपरिवारासोबत सहलीचा निखळ आनंद लुटू या. निसर्गाच्या आनंदाला तुम्हां सर्वांच्या उत्साहाची जोड मिळू दे, आणि दरवर्षी अशी धम्माल पिकनिक करण्याचा पायंडा पडू दे.

महाराष्ट्र मंडळ शिकागो आपल्याला व आपल्या परिवाराला आग्रहाचे निमंत्रण देत आहे.
त्वरा करा, वेळ दवडू नका, महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या वेबसाईटला भेट द्या आणि रजिस्ट्रेशन करूनच टाका!

धन्यवाद,
कार्यकारिणी,
महाराष्ट्र मंडळ शिकागो २०२२

Dear Friends,

With the sun spreading its molten gold everywhere, the nature has come alive with its  colors! Everywhere you see the splash of color which automatically pastes a smile on our face! So aren’t we all ready to enjoy this party Nature is throwing for us? And what is a party without a few friends ? Maharashtra Mandal Chicago is giving us an opportunity to be part of such an event – MMC Summer Picnic.

When – July 9, 2022
Where – Schiller Woods Picnic Grove #12 (https://goo.gl/maps/prjxMWFBYEoyTxPHA
Time – 10 AM to 4 PM 

Program timeline:
10 AM – 11 AM – Breakfast 
12.30 PM – 2 PM – Lunch
3:30 PM – 4 PM – Snacks 

So gather your hats, sunscreen, sunglasses and come one, come all to enjoy! 

You will get to:
– sing your heart out with karaoke 
– shake those legs with flash mob 
– multiple games
– and as always, great food and great company!

So close your eyes, think of our last years picnic and get registered for this years picnic NOW! See you all there!

Please reach out to us if you have any questions. 

Warm Regards,
MMC 2022 Karyakarini


Khau Galli Bramanti Rules:

  • You will get a number as a participant to keep it anonymous and that will be your identification for this competition
  • The presentation should be done in cupcake liners. Easy for the judges to pick one and taste
  • You will need to bring a tray to place your presentation in.
  • Judging will be done by our own members, friends and family.
  • The final day for sending intention of entry and name of the dish being prepared is Thursday July 7th.

Servings to be prepared is a minimum of 15 to 20.
Food will be judged on taste, presentation, and uniqueness. The item has to be bite size/ snack size. It can be any street food cuisine from entire India ( no boundaries of cuisine example can be north Indian, south, east or west).


For any queries please get in touch with karyakarini@mahamandalchicago.org

So let’s get cooking.. Looking forward to some amazing creations from all…